भारतीय गणित

भारतीय गणित 

भारतीय गणित

Jump to navigationJump to s



भारतीय उपखंडात गणिताची सुरुवात वैदिक पूर्व ते उत्तर वैदिक काळातील (सुमारे इ. स. पू. ७००० - इ. स. २००) यजुर्वेदशतपथ ब्राह्मण व शुल्ब सूत्रे इत्यादी ग्रंथांमध्ये प्राथमिक स्वरूपांत झाली. यजुर्वेद संहितेमधून आज प्रचलित असलेल्या दशमान पद्धतीचा उगम झाला. गणिताच्या दृष्टीने शुल्ब सूत्रांस विशेष महत्त्व देता येईल. शुल्ब सूत्रे हे बौधायनमानवआपस्तंब व कात्यायन यांनी इ. स. पू. ८०० ते इ. स. पू. ३०० च्या सुमारास लिहिली आहेत. या सूत्रांमध्ये भूमितीबौधायनचा सिद्धान्त (पायथागोसचा सिद्धान्त), बौधायनची त्रिके (पायथागोसची त्रिके), पाय (π) ची ३.१४ ही किंमत आणि संख्यांचे वर्गमूळ या विषयांवर चर्चा केलेली आढळते. पाणिनी या संस्कृत व्याकरणकाराने त्यांच्या ग्रंथात बुलियन लॉजिक आणि कंटेक्स्ट फ्री ग्रामर यांचा प्रथमत: उपयोग केलेला आढळतो. त्यांना बॅकस-नौर फॉर्म (BNF) चा अग्रदूत मानले जाते. छंदशास्त्रावरच्या लेखनात मेरु प्रस्तारद्विपद प्रमेयपिङ्गल संख्या आणि  ची कॉंबिनेटरियल आयडेंटिटी याबद्दल पिङ्गल या संगीत तज्ज्ञाला बरेचसे ज्ञात होते असे आढळून येते.

भारतीय गणिताच्या दृष्टीने मध्ययुगीन कालखंड (इ.स. ४०० ते इ. स. १६००) हा विशेष म्हणता येईल. आज उपयोगात येणारी दशमान पद्धत मध्ययुगीन भारतात शोधली गेली. भारतीय गणित तज्ज्ञांनी शून्याचा एक संख्या म्हणून प्रथमत: अभ्यास केला. मध्ययुगीन कालखंडात पहिला आर्यभटआचार्य वराहमिहिरआचार्य ब्रह्मगुप्तपहिला भास्कराचार्यआचार्य वीरसेनमहावीर आचार्यश्रीधराचार्यमंजुलदुसरा आर्यभटआचार्य श्रीपतीनेमीचंद्र सिद्धान्त चक्रवर्तीदुसरा भास्कराचार्यसंगमग्रामचे माधवाचार्यज्येष्ठदेव व नीलकंठ सोमयाजी अशा अनेक शास्त्रज्ञांचे गणित व खगोलशास्त्रात मोठे योगदान आहे.

ह्या शास्त्रज्ञांनी पाय (π) ची किंमत, दशमान पद्धतशून्यऋण संख्याअनंतअंकगणितबीजगणितक्षेत्रमितीभूमितीत्रिकोणमितीत्रिकोणमितीय चलने व त्यांचे तक्ते, क्षेत्रमितीवर्ग व घन समीकरणेडायोफॅंटाईन समीकरणेकंटिन्यूड फ्रॅक्शन्सघातांक शृंखलाअनंतांश कॅलक्युस आणि विभेदीय व समाकलनीय कॅलक्युलसची प्रारंभिक संकल्पना ह्या गणितीय विषयांवर; तर सौर मंडळाची सूर्य केन्द्रीयता, पृथ्वीचा परिवलन व परिभ्रमण काल, सूर्योदयाचे समीकरणचंद्राचे वर्धमानसूर्यग्रहणचंद्रग्रहणग्रहांचे परागमन, फिरते ग्रहगोलीय अक्षांशग्रहांचे परस्पर सबंधग्रहांचे ताऱ्यांशी सबंध आणि गुरुत्वाकर्षणाची प्रारंभिक संकल्पना ह्या खगोलशास्त्रीय विषयांवर संशोधन केले.